Posts

खंत

श्री गणेशाय नमः नमस्कार,  मी अजित विनोद पंडीत आज पासून मी "नॅनोकथा" हे छोट्याश्या हलक्या फुलक्या कथांचे सदर सुरू करत आहे, आपण माझ्या अष्टागर पालघर ह्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. नॅनोकथा ajittales.blogspot.com ह्या माझ्या ब्लॉगला आपण असाच प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. चला तर आपण सुरूवात करूया आजच्या पहिल्या कथे पासून. आजच्या कथेचे नाव आहे "खंत" काहीवेळेस आपल्याला एखादी गोष्ट करायची खूप इच्छा असते मात्र परिस्थिती आपल्याला ते करू देत नाही. मनात असून देखील एखाद्याला आपण मदत करू शकत नाही, ह्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट नसावी. सद्यस्थितीमध्ये आपण कोरोना महामारीला सामोरे जात आहोत या आजाराने अनेक गोष्टी बदलून गेल्या आहेत अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपण करू शकत नाहीत. त्याच अनुषंगाने आजची कथा आहे. अजय खूप चांगला आणि साधा युवक, सगळ्यांचे सगळे छान व्हावे ह्या मताचा. खूप काही नाही पण छोट्यामोठ्या मदती करायला त्याला आवडत असे. एकदा आपल्या चारचाकी वाहनातून भरदुपारी सरकारी कार्यालयातील ऑफिशियल काम आटोपून पुन्हा ऑफिस ला निघाला होता. मे महिना म्...